जेव्हा मी तिला पहिल्यांदा बघितले ,तेव्हा मनात असा विचार आला
जीवनात प्रथमच मला ,कमी अभ्यास करण्याचा पश्चाताप झाला
नकळतच IT branch विषयी , माझी आपुलकी कमी झाली
कारण आता COMP branch ची ओढ , मनात सुरु झाली
कितीतरी प्रयत्नानंतर शेवटी , COMP मध्ये admission झाली
आणि वाटले कि आता , माझी गाडी रुळावर आली
तिला बघन्यासाठी तर मी आता ,रोजच college करायचो
नकळतच मात्र मी , defaulter list च्या बाहेर असायचो
आता जीवनात बनला माझा , एकच ध्यास
एकदा तरी तिच्याशी , अभ्यासा व्यतिरिक्त बोलावं
आणि तिच्याविषयी ,माझ्या मनात काय आहे
हे तिला एकदाच स्पष्टपणे सांगून टाकावं
पण एकदाही कधी तिच्याशी ,बोलण्याचे धाडस झाले नाही
आणि तेवढ्यातच कळले कि तिने ,माझ्याकडे त्या दृष्टीने कधी बघितलेच नाही
आता हा विषय ,इथेच close करण्याचे मी ठरविले
आणि माझे लक्ष आता , अभ्यासाकडे केंद्रित केले
कारण first sem exam ,जवळ आली होती
खरोखरच आता ,अभ्यास करण्याची गरज भासत होती
परीक्षेला राहिले होते आता ,फक्त पंधरा दिवस
मी आणि माझा roommate पेटलो होतो रात्रंदिवस
परीक्षेचे ते कंटाळवाणे आठ दिवस ,आम्ही कसेतरी काढले
आणि अपेक्षा नसताना सुद्धा ,६४% पाडले
तेवढ्यातच मला एकापेक्षा एक ,जिवलग मित्र भेटायला लागले
आणि त्यांच्यासोबत आता , माझे मन रमायला लागले
कारण आमचा group आहे एकदम निश्चिंत आणि मौज मस्ती करणारा
आयुष्याचा प्रत्येक क्षन , लाखमोलाचा असल्यासारखा लुटणारा
group मधला एकही मुलगा , मुलींविषयी न बोलणारा
पण प्रत्येक defaulter list मध्ये ,सर्वांची नावे वर असणारा
प्रत्येक sem ला , college ला कमी झालं जाणं
आणि आता सुरु झाले , १-२ विषय back राहाणं
पण शेवटी मला ,हे १-२ विषय back असल्याच्या दुखापेक्षा
माझ्या मित्रांसोबत जीवनाचा आनंद लुटण्याचे सुख कितीतरी पटीने जास्त वाटले
पूर्ण ४ वर्षात मुलींबद्दल कधी , विचार मनात आलेच नाही
आणि अशाप्रकारे ENGG. चे ४ वर्ष ,माझ्या जिवलग मित्रांसोबत कसे गेले कळालेच नाही, कळालेच नाही ......
रोशन थिगळे